सुखाची बहुआयामी संकल्पना आणि भारतीय दृष्टिकोन
भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत एक अत्यंत मानवी असा आशीर्वाद वारंवार उच्चारला जातो “सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः”. याचा सरळ अर्थ असा की सर्व लोक सुखी व्हावेत, सर्व लोक निरोगी राहावेत. प्राचीन ऋषींच्या चिंतनातून उमटलेली ही भावना इतकी वैश्विक होती की तिच्यात कोणत्याही जाती, धर्म, वर्ण, राष्ट्र यांचे बंधन नव्हते. ही भावना म्हणजे भारतीय विचारसरणीच्या सार्वत्रिक …